|
Description:
|
|
मित्रांनो पुणेकरांवर अनेक विनोद व्हाट्सअप व फेसबुक वर फिरत असतात. खरंतर ह्यातून पुणेकरांविषयी एक मिश्कील भीती व्यक्त होते. परंतु इतर प्रांतांतून कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, आयटी प्रोफेशनल्स पुण्यामध्ये आल्यामुळे सर्व प्रकारच्या लोकांची वस्ती पुण्यात वाढू लागली आहे. विश्वबंधुत्वाचा वसा घेतलेल्या ह्या पुण्यातला मूळ पुणेकर किंवा अस्सल पुणेकर कमी होत चाललाय असं काहीसं लटक्या चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. त्याविषयी डॉ. अशोक कुलकर्णी लिखित मजेशीर लेख ऐकूयात "शब्दफुलें" च्या आजच्या भागात सुजाताच्या आवाजात! |